४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन

 लोकनेते मुंडे साहेबांचा ३ जूनला दहावा स्मृतीदिन ; पंकजाताई मुंडे यांचं राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन


यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल ; जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा



लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये म्हणून घेतला निर्णय



४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन


परळी वैजनाथ।दिनांक ०१।

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा येत्या ३ जून रोजी दहावा स्मृतीदिन असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील समस्त कार्यकर्त्यांना  यावर्षी गोपीनाथ गडावर न येता  जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा असं आवाहन केलं आहे. ४ जूनला लोकसभेची मतमोजणी असल्याने आपल्या विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करा  असंही त्यांनी म्हटलं आहे.


   यासंदर्भात सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी करून पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना विनंतीवजा आवाहन केलं आहे. पंकजाताईंनी म्हटलं आहे की,दरवर्षी 3 जून हा दिवस येतो तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये  कालवल्यासारखं होतं. मुंडे साहेबांसारखा नेता, आपलं उर्जास्थान, आपलं शक्तीस्थान, आपलं प्रेरणास्थान, आपलं श्रध्दास्थान..आपल्यातून गेले ३ जून यादिवशी..माझा पिता हरवला, तुमचा नेता हरवला. माझ्या पित्यावर, माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या पित्यापेक्षाही जास्त प्रेम केलं. आज दहा वर्षे झाली त्यांना जावून पण तरीही तुम्ही न चुकता ३ जूनला गोपीनाथ गडावर येता. यावेळेस एक योगायोग आलेला आहे तो म्हणजे ३ जूनला मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ४ जूनला लोकसभेची काऊंटिंग आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, काऊंटिंग एजंटला ३ जून रोजी संध्याकाळीच बीडला जावे लागते कारण पहाटे उठूनच त्यांना काऊंटिंगसाठी जावे लागते. मला ही अडचण पूर्णपणे लक्षात आहे. आपली सगळ्यांची इच्छा असून देखील आपल्या सर्वांना यायचं असून देखील ही तळमळ मी समजू शकते. म्हणून मीच तुमची ही अडचण दूर करायचं ठरवलं आहे.


*जिथे आहात तिथूनच पुण्यस्मरण करा*

------

मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते की, आपण जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा. मुंडे साहेबांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा आणि आपण यावर्षी गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल. ४ जूनला मुंडे साहेबांच्या विजयाचा मोठा ध्वज घेऊन मुंडे साहेबांच्या चरणी आपण हा विजय अर्पित करूया. यावेळेस आपण नाही आलात याविषयी मनामध्ये कुठलेही दुःख बाळगू नका. आपण पुढच्या वेळी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगले समाजोपयोगी कार्यक्रम करू, त्यावेळी फार मोठया संख्येने आपण उपस्थित रहा. दरवर्षीप्रमाणे आमचं कीर्तन असतं, भोजन असतं ते आम्ही यावर्षी रद्द केलेलं आहे. आपली अडचण टाळावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील माझ्या समस्त लोकांना विनंती करते की, यावेळेस ३ जूनला आपण कृपया गोपीनाथ गडावर येवू नये. ही विनंती आपण नक्की मान्य कराल आणि माझ्या या विनंतीचा मान राखाल..एवढीच आपल्याकडून अपेक्षा करते.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार