अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले ; गुन्हा दाखल
अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले ; गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले व जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी वैजनाथ येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, धनगर गल्ली गणेश पार परळी वै. येथील रहिवाशी विवाहितेस नवरा व सासूने सातत्याने तीन महिन्यांपासून शारिरीक व मानसिक त्रास दिला.दि. 1 जुन रोजी रात्री 10.20 वा. पिडितेला जिवे मारण्याचा उद्देशाने अंगावर रॉकेल टाकुन काडीने पेटवुन दिले.यात पिडिता जखमी झाली.तिला अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या पिडितेने जवाब नोंदवून फिर्याद दिली.याप्रकरणी पिडीत महिला जयश्री गणेश फुके वय 20 वर्षे यांच्या फिर्यादीवरून गणेश जगन्नाथ फुके (नवरा)व वंदना जगन्नाथ फुके (सासु) यांच्याविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 91/2024 कलम 307,498 अ,323,34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा