शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर :३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

 शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर :३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान


परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)

          येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात श्री शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यास युवक,महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

             शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याशी श्री शनी मंदिरात गेल्या १२ वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रविवारी (ता.०२) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यात युवक, महिला, पुरुष यांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अनेकांनी सपत्नीक आपले रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तृत्व पारपाडले. या रक्तदान शिबीरात रक्तसंकलनाचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी आंबेजोगाई येथील डॉ.स्नेहल कराड, आनंद सिताप, जगदिश रामदासी, सैयद नजीर, बाबा शेख, श्री.यादव, शामली, रामप्रसाद, मुस्कान, वृषाली, स्वराज यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी, तेली युवक संघटना, श्री शनैश्वर प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शनैश्वर भक्त मंडळ, शनैश्वर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार