प्रियसीसोबत भांडण; प्रियकराला पाजले विष: आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल
प्रियसीसोबत भांडण; प्रियकराला पाजले विष: आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून जीवानिशी जाण्याचा प्रकार समोर आला आहे. अगोदर प्रियसीसोबत भांडण झाले. त्यात प्रेमसंबंध ताणले गेले. त्यानंतर धर्मापुरी फाट्यावरील एका आखाड्यावर बोलावून या प्रियकराला मारहाण केली व विष पाजले यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, धर्मापुरी फाट्यावर एका अखाड्यावर मयत मारोती भरत चौधरी वय 32 वर्ष रा कारबेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी यास बोलावून घेऊन त्याचे प्रेमसंबध असलेल्या महिलेशी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन यातील आरोपींतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन मारहाण केली.तसेच हिरव्या पांढऱ्या रंगाचे स्टिकर असलेली जर्मन धातुची PROFEX super असा उल्लेख असलेल्या किटकनाशकाच्या बाटलीतील विषारी औषध जिवे मारण्याच्या उदेशाने पाजले.
त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी शेषराव भरत चौधरी वय 27 वर्षे रा. कारबेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत मनोहर देवकते, प्रियंका प्रभाकर चौधरी, सोनेराव मनोहर देवकते, रेखा मनोहर देवकते, मनोहर सोनेराव देवकते, कृष्णा श्रीरामे, नाईकवाडे (पुर्ण नाव माहीत नाही), गौरव (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. बुक्तरवाडी ता. सोनपेठ जि. परभणी या आठ आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन-165/2024 कलम 302, 143,323, 147,149, भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि कवडे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा