•••••••••••••••
दर्जा व विश्वासपूर्ण माहिती -आपल्या हक्काचे व्यासपीठ -प्रत्येकाची 'माझी बातमी'
•••••••••••••••
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
जितना कठीण संघर्ष होगा, जित उतनीही शानदार होगी - लोकसभेच्या निकालावर केलं भाष्य
मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा आणि वंचितांच्या सेवेचा वसा कधीही खाली ठेवणार नाही - पंकजाताई मुंडे
जितना कठीण संघर्ष होगा, जित उतनीही शानदार होगी - लोकसभेच्या निकालावर केलं भाष्य
अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर लोटली अलोट गर्दी
परळी वैजनाथ।दिनांक ०३।
लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून जावून आज दहा वर्ष झाली. आपण सर्व हे दुःख हृदयात साठवून त्यांच्या संस्कारांवर वागलो. साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, उपेक्षित व पंडितांच्या सेवेसाठी खर्च केलं, आयुष्यभर त्यांनी सर्व सामान्यांसाठी जो संघर्ष केला, जे कष्ट घेतले त्यामुळे ते आपल्या सर्वांच्या कायम लक्षात राहिले. आज त्यांच्या समाधीसमोर मी तुम्हाला वचन देते, मी कधी थकणार नाही, रूकणार नाही, कुणासमोर कधी झुकणार नाही. उतणार नाही, मातणार नाही त्यांच्या विचारांचा वारसा आणि वंचितांच्या सेवेचा वसा कधी टाकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज गोपीनाथ गडावर जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते, त्यावेळी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे बोलत होत्या.
पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, मुंडे साहेबांना जाऊन आज दहा वर्षे झाली पण आजही त्यांचं नुसत नाव घेऊन डोळे बंद केले तर समोर एक हसरा, उमदा आणि प्रत्येकाला आपला वाटणारा चेहरा समोर येतो. एका लोकनेत्याचं जीवनकार्य त्याच्या पश्चातही कसं चालू रहात याचं हे आदर्श उदाहरण आहे. ते आजही आपल्या आचार विचार आणि श्वासात जिवंत आहेत. साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, पिडित व सर्व सामान्य वर्गासाठी खर्ची घातलं. अनेक दुर्लक्षित घटकांना, कार्यकर्त्यांना प्रवाहात आणलं. आमदार खासदार बनविणारी फॅक्टरी असंही त्यांना म्हटलं जात होतं. त्यांच्या विचाराचा वारसा आणि वसा जपण, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं दायित्व आहे. मी कधीही हा वसा खाली ठेवणार नाही.
जितना कठीण संघर्ष होगा...
----
लोकसभेच्या निकालावर बोलताना त्या म्हणाल्या, उद्याच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक करणार यात कसलीही शंका नाही. कन्याकुमारी येथे ज्याठिकाणी मोदींनी ध्यान केलं त्या स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. 'जितना कठीण संघर्ष होगा, जीत उतनीही शानदार होगी' देशाचं राजकारण आता बदलत आहे. देशाला पुढे नेण्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी मोदींचं नेतृत्व आवश्यक आहे.२०४७ पर्यंत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ज्या मुंडे साहेबांनी पक्ष संघटनेसाठी आपलं उभं आयुष्य वेचलं त्यांच्या पुण्यतिथीच्या दुसर्या दिवशी सत्तेची हॅटट्रिक होणं यापेक्षा काय मोठं असेल, हे यश मुंडे साहेबांनी पक्षासाठी केलेल्या कष्टाच आहे.
मला निकालाची धाकधूक वाटत विजय निश्चित
-----
बीडचा निकाल काय लागणार याची धाकधूक मला होत नाही कारण माझ्या हृदयातील हुरहूरीची जागा साहेबांच्या जाण्यानं घेतली, यापेक्षा दुसरे मोठे दुःख माझ्या आयुष्यात असू शकत नाही. बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही. प्रत्येकांना सोबत घेऊन काम केलं. मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही. समाजातील कुठल्या वर्गाला, वर्णाला शब्दाने घायाळ केलं नाही. मी नेहमीच जातीपातीच्या पलिकडे जावून सर्व वर्गासाठी काम केलं आणि पुढेही करत राहणार आहे. आज जिल्हयाला पिढी बिघडविणारे नव्हे तर पिढी घडविणारे नेतृत्व हवे आहे, त्यामुळे उद्या माझा निश्चित विजय होणार याची मला खात्री आहे.
कुटुंबियांसह गोपीनाथ गडावर नतमस्तक : भजनातही तल्लीन
-----
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११.१५ वा. पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, आई प्रज्ञाताई मुंडे, बहिण ॲड. यशःश्रीताई मुंडे तसेच जावई गौरव खाडे, मुलगा आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे व परिवारातील अन्य सदस्यांसह गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी धार्मिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंकजाताई स्वतः हातात वीणा घेऊन वारकऱ्यांसोबत भजनात तल्लीन झाल्या होत्या. जिल्हयातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भिषण आपघात घडला असुन परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.एकावर उपचार करण्यात येत आहेत. अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले.या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी,रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली,शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडू...
*करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात ...
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी... शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढ...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा