बी एण्ड सी च्या हलगर्जीने गेला बळी !

गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ऑटो पलटला: कामगार महिलेचा मृत्यू



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

  गतिरोधकाचा अंदाज न आल्याने एक ऑटो पलटला व आपघात घडला.या आपघातातील प्रवाशी कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे.या रस्त्यावर गतिरोधकांवर  पारा लावण्यात आलेला नाही.त्यामुळे अंधारात वाहनधारकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही. यातूनच हा आपघात घडला असुन यात महिलेचा जीव गमावला आहे.

      परळीतील वैद्यनाथ कॉलेज समोरील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अंबाजोगाई कडे जाणारा ऑटो पलटी होऊन अपघात झाला.यामध्ये अलका काकासाहेब सूर्यवंशी (वय 40) रा.अंबाजोगाई या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.ही महिला परळीत एका कपड्याच्या दुकानात कामाला होती. रात्री 10.30 वा. च्या सुमारास अपघात झाला.या गतिरोधकामुळे याआधी अनेक अपघातात लोकांना गंभीर दुखापत झालेल्या असून आता तर या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !