"अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...!' धनंजय मुंडे यांची निकालानंतर सूचक प्रतिक्रिया

 "अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...!'  धनंजय मुंडे यांची  सूचक प्रतिक्रिया


        बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देऊन सूचक आवाहन केले आहे.
      धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून पोस्ट केली असुन एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते असे म्हणत उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली!" असे म्हटले आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट?

"राज्यात महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार.बीडमध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

तर "पंकजाताईच्या या लढाईत 6 लाख 77 हजारपेक्षा अधिक मतदानरुपी आशीर्वाद दिलेल्या माय बाप जनतेचे तसेच अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्यवर नेत्यांचे तसेच सर्व जिवलग सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते. उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली!" 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?