अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा विजय
अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा विजय
बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभूत करून बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. बीडच्या निकालाने शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. कधी पंकजा मुंडे आघाडीवर जात होत्या, तर कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे पुढे जात होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली.
२४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही लिड घटू लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. शेवटपर्यंत हा सस्पेन्स कायमच होता अखेर 32 व्या फेरीनंतर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी झाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा