अज्ञातांचा खोडसाळपणा: अंधारात रस्त्यावरील वाहनाची तोडफोड
अज्ञातांचा खोडसाळपणा: अंधारात रस्त्यावरील वाहनाची तोडफोड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अंधाराचा गैरफायदा उठवत खडसाळपणाचे कृत्य करून परळी शहरातील गणेश पार रोडवर रस्त्यावर लावलेल्या वाहनांची किरकोळ तोडफोड केल्याची घटना घडली.
गणेशपार रोड, श्री संत सावतामाळीनगर, कृष्णा नगर भागात घरा समोरील रस्त्यावर लावलेल्या ९ चारचाकी वाहनांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना चार जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पाऊस झाला. यावेळी वीज गेल्याने रस्त्यावर अंधार होता. या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गणेशपार रोडवर लावण्यात आलेली कार, ऑटो रिक्षा या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच संत सावता माळीनगर, कृष्णा नगर भागात देखील कारची तोडफोड केली. याप्रकरणी बुधवारी परळी शहर पोलीस ठाण्यात व संभाजीनगर पोलीस ठाण्यात कारचालक सतीश सानप, प्रकाश वर्मा ,नवनाथ चव्हाण यांनी तक्रार केली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सपोनी शिंदे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा