इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन


बीड, दि. 6 (जि. मा. का.) :- सध्या खरीप 2024 हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते व नंतर औषधे खरेदी करत असतात त्यांना उत्तम दर्जाचे खते बियाणे व औषध उपलब्ध व्हावे, योग्यरीत्या किमतीत उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यात गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाची कार्य कक्षा तालुकास्तरावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी तथा निरीक्षक यांच्यापर्यंत आहे


      खरीप हंगामात या दोन्ही कार्यालयात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यांची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत अशी आहे. याशिवाय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांची भरारी पथके कार्यरत आहे.


       जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी व जिल्हा गुणवत्ता निरिक्षक यांचे भरारी पथक कार्यरत आहे. याशिवाय राज्यस्तरावरील कक्षाचे व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच कृषी उपसंचालक, उपविभागाची कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचे तंत्र अधिकारी यांनाही निरीक्षकाचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.


       खते बियाणे व औषधी संबंधित काही अडचणी असल्यास शेतकरी त्यांच्या स्थानिक कार्यक्षेत्रातील तालुका अथवा पंचायत समिती कक्षाकडे अथवा भरारी पथकाकडे करू शकतात या विविध स्तरावरील पक्षांचे तसेच भरारी पथकांचे दूरध्वनी क्रमांक शेतकरी वर्गासाठी खुले करण्यात आलेले आहेत. त्यांची यादी सोबत जोडली आहे.


       विशिष्ट कंपनी अथवा ग्रेड अथवा वाणाचा कोणीही आग्रही ठेवू नये. बाजारात बियाण्यांची असंख्य प्रकार उपलब्ध आहेत त्यानुसार पर्याय ठेवावा. विशिष्ट ग्रेडचे खत उपलब्ध नसल्यास कृषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकरीस्तरावर विविध खते सरळ खतांपासून तयार करणे शक्य आहे. तेव्हा पुनश्च आवाहन कोणत्याही विशिष्ट बियाण्याचे वाण उत्पादक अथवा खतांचे विशिष्ट कंपनीचे विशिष्ट ग्रेड यांचा आग्रह ठेवू नये. अशी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


                                                *******



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!