मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी

 मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी


बीड, दि.2:( जिमाका ) सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी दिनांक 4 जून होणार आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघाची  मतमोजणी  नाथापूर रोड शासकीय तंत्रनिकेतन येथे आहे. मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी असणार असल्याचे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.


मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मतमोजणी अधिकारी-  कर्मचारी, सुपरवायझर, सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, उमेदवारांचे नेमलेले प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्याची मनाई आहेच   यासह  अँड्रॉइड मोबाईल घड्याळ मोबाईलच्या पद्धतीने चालविली जाते असे कुठल्याही तांत्रिक उपकरणे  सोबत ठेवण्याची ही बंदी असेल.


अशा प्रकारच्या तांत्रिक वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी वापरण्यात आल्यास प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करेल असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत.


तरी मतमोजणी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्मनिरीक्षक शिपाई उमेदवारांचे प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी या सर्वांना मोबाईल अँड्रॉइड घडी तसेच तस्सम तांत्रिक उपकरणे मतमोजणी कक्षात घेऊन जाण्याची सक्त मनाई असेल याची दखल सर्वांनी घ्यावी असे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !