शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी उपयोजना
शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी उपयोजना
बीड, दि. 6 (जि. मा. का.) बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सोयाबीन कापूस भाजीपाला आदी पिकांवर शंकी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या गोगलगायींना वेळीच ओळखून खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल.
शंखी गोगलगाय किडीची ओळख:- शंकीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंकी गर्द, करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही कीड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते तसेच नवीन रोपे, कोबं, भाजीपालावर्गी पिके, फळे, फुले तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरी उपजिका करते.
प्रतिबंधात्मक उपायोजना:- शेतकऱ्यांनी ८० ते १०० मी.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीचे खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावे, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून गोगलगायना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. रबरी हात मोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंकी गोगलगायी व त्यांची लपण्यास व अंडी घालण्यापासून रोगखता येते.
रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
गुळाच्या द्रवणात एक किलो गुळ प्रति दहा लिटर पाणी गोणपाटाचे पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळेस शेतात पिकाच्या ओळीत पसरून द्यावीत. त्याखाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करून उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रावणात किंवा केरोसीन मिश्रित पाण्यात टाकून माराव्यात किंवा खोल खड्ड्यात पुरुन वरून चुण्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा.
लहान गोगलगाईच्या नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी, शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतल्या बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा 4 ते 5 इ्रच पट्टा टाकल्यास गोगलगायींना अटकावा होतो.
रासायनिक उपयोजना मेटाल्डिहाईड 2.5 टक्के भुकटीचा 50 ते 80 ग्राम 100 स्केअर फुट वापर गोगलगाईच्या मार्गात, पिकाच्या दोन ओळीत किंवा प्रादुर्भाकवत क्षेत्रात केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण करता येते.
गोगलगायीच्या नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करता येतो. त्यासाठी गहू किंवा भाताचा भुसा किंवा कोंडा 50 किलो अधिक 25 ग्रॅम ईस्ट गुळाच्या द्रवणात 200 ग्राम गूळ प्रति 100 लिटर पाणी 12 ते 15 तास भिजत ठेवावा. त्यात मिथोमिल 40 एस.पी या कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळावी. अशा रितीने तयार केलेले आमिष संध्याकाळच्या वेळी प्रादुर्भावित शेतात पसरवून द्यावे. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातामध्ये रबरी मोजे घालून गोळा कराव्यात. व 1 मीटर खोल खड्ड्यात पुरून टाकाव्यात.
मिथेमिल हे अत्यंत विषारी कीटकनाशक असल्याने पाळीव प्राणी तसेच भटके प्राणी किंवा पक्षी अमिषांनी मेलेल्या मेलेल्या खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी.
शंकीगाईच्या नियंत्रणासाठी एकटया शेतकऱ्यांने प्रयत्न करतात सामूहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशी प्रमाणे उपचाराचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
********
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा