असे करा पिकाचे नियोजन

असे करा पिकाचे नियोजन



       बीड, दि. 6 (जि. मा. का.) :सध्या जिल्ह्यात सर्व दूर पेरणीला लायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीची घाई करू नये. साधारणतः 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल व जमिनीत साधारणतः सहा इंच ओल झाली त्यानंतर पेरणी करावी.पेरणी करण्यापूर्वी घरच्या घरी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. रासायनिक खतांचा अति वापरा अयोग्य वापर जमिनीच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा रासायनिक खते वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांचा बेसल डोस ठरविताना माती परीक्षण अहवाल अथवा गावचा जमीन सुपिकता निर्देशांक याचा वापर करून तो डोस पेरणी वेळी द्यावा. रासायनिक खतांची बचत होण्यासाठी बियाणास जैविक खतांची वीज प्रक्रिया करावी. आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांना संपर्क करून आपण बियाणे उगवण बीज प्रक्रिया आदींचे प्रत्याक्षिक  देखील करू शकता, असे आवाहन जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी  यांनी केले आहे.


                                                        ******



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !