मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी : मतमोजणी निरीक्षक

 मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी : मतमोजणी निरीक्षक


            बीड, दि.02(जीमाका): मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी यासाठी योग्य ते प्रशिक्षण अधिनस्त कर्मचाऱ्यांना देण्याचे आवाहन मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर. सोमन्ना यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर सोमन्ना जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी श्री आर सोमन्ना बोलत होते. 

जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतमोजणी निरीक्षक श्री आर. सोमन्ना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, पोस्टल बॅलेटचे सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी ओमकार देशमुख मंचावर उपस्थित होते. 

माजलगाव, परळी, बीड, केज मतदार संघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशिक्षण घेणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्री आर. सोमन्ना, म्हणाले मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या 4 जूनला मतमोजणी होणार आहे या मतमोजणीचे प्रशिक्षण यापूर्वी देण्यात आले असून प्रत्येक नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडताना अतिशय लक्षपूर्वक ती करावी. मतमोजणीच्या प्रक्रियेतील प्रत्येक फेरी मध्ये उमेदवारांकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींचे समाधान होईपर्यंत पुढे जाऊ नये. लिहिण्यात येणारी मतमोजणीची संख्या ही सुपरवायझर, सहाय्यक तसेच सूक्ष्म निरीक्षक  आणि उमेदवार यांच्या प्रतिनिधींनी बघितल्यानंतरच लिहावी. 

 

सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर संगणकाद्वारे देण्यात येणारी माहिती ही परिपूर्ण योग्य असल्याची खात्री करूनच ती स्वतः लिहून जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सादर करावी. 

बीड मतदारसंघात 41 उमेदवार आणि एक नोटा असे 42 ची यादी असल्याने मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे. परंतु तरी देखील ही मतमोजणी लक्षपूर्वक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पार पाडणे हे प्रत्येक नेमलेल्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य असून त्यांनी त्याची कर्तव्याची जाणीव ठेवून ही प्रक्रिया पार पाडावी. 

मतमोजणीच्या प्रक्रियेत नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने तसे नियोजन ठेवून काम करणे आहे. यासह मतमोजणी दरम्यान कोणाकडे मोबाईल राहणार नाही.

मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले तक्ते हे नीट  सुवाच्च इंग्रजी अक्षरात लिहिणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेले मतमोजणी निरीक्षक हे प्रत्येक फेरीतील कुठल्याही दोन कंट्रोल युनिटची तपासणी सूक्ष्म निरीक्षकांच्या माध्यमातून करतील. मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेली तपासणी आणि मतमोजणी निरीक्षकाकडून झालेल्या तपासणीमध्ये एक वाक्यता असायला हवी. यात तफावत आढळल्यास ताबडतोब सदर कर्मचारी बदलून घेतला जाईल व त्या कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या कलमानुसार  कारवाई करण्यात येईल. 

यासह एकूण मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान पाच व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणी केली जाईल. ही मतमोजणी कशी असावी याबाबत आज प्रशिक्षण देण्यात आले. व्हीव्हीपॅट मशीन मधून सर्व चिठ्ठया काढून ही चिठ्ठी ज्या उमेदवाराच्या अनुक्रमांकाची असेल त्या पिजन बॉक्स मध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी यांना समक्ष दाखवून जोराने बोलून ठेवावी. यात आधी पिजन बॉक्समध्ये मार्क केलेले नंबर नीट पहावे आणि त्याप्रमाणे त्या त्या बॉक्समध्ये पडलेल्या मतदानाची स्लिप टाकावी. शेवटी त्याची मोजणी करावी या प्रक्रियेमध्ये गल्लत करता कामा नये अगदी शांतपणे ही प्रक्रिया पार पाडावी. ही सर्व प्रक्रिया व्हिडिओ ग्राफीमध्ये रेकॉर्ड होणार असून ती निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल.

 

मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असताना विधानसभा निहाय नेमलेल्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी ती वस्तुनिष्ठ पद्धतीने नेमकी होत आहे का याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. तसेच एकूण मतमोजणीची संख्या स्वतः लिहावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी यावेळी दिले. व्हीव्हीपॅट मधील पर्चीची मोजणी कशी करावी याबाबतचे प्रशिक्षण केज चे सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक वजाळे यांनी दिले.

नाथापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार असून या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणावरून या इमारतीच्या बाहेर जाता येणार नाही त्यांना लागणाऱ्या खाण्यापिण्याचे पदार्थ हे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरवण्यात आले असून या ठिकाणी आरोग्य विषयी समस्या उद्भवल्यास त्यासाठी आरोग्य विभागाने ही योग्य ते नियोजन केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार