25 वर्षांपासूनची कायम

जय्यत तयारी; दिव्य जागृती संस्थानच्या वतीने परळीत मंगळवारी गुरूपोर्णिमा महोत्सव

जिल्ह्यातील 5 हजार भक्तांच्या उपस्थितीत गुरु पौर्णिमा; 25 वर्षांपासूनची  कायम


परळी वैजनाथ/प्रतिनिधी 

दिव्य जागृती संस्थानच्या वतीने आज मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परळीत दिव्य ज्योती जागृती संस्थानची गुरूपौर्णिमेची 25 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरजवळ असलेल्या हालगे गार्डन येथे जय्यत तयारी करण्यात येत आहे. या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातून 5 हजार भाविक येणार आहेत. दिव्य जागृती संस्थानच्या वतीने दरवर्षी गुरूपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्यानुसार यंदा उद्या 23 जुलै रोजी सकाळपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 9 वाजता भारतीय संस्कृती नुसार वेद मंत्राचे उच्चारण होणार आहे. सकाळी 10 वाजता गुरू महाराजांची आरती होईल. 10.30 वाजता सत्संग प्रवचन, भजन होणार आहे. दिल्ली येथील गुरु महाराजांच्या शिष्यांचे यावेळी प्रवचन होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रमाची जय्यत तयारी केली जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू महाराजांच्या आरतीसह, प्रवचन होणार असल्याने भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गुरुंचे स्थान प्रत्येक भक्त गणांच्या मनात अढळ आहे. गुरूने दाखवलेल्या मागनि चालून जीवनाचा उद्धार करून घेण्याचा प्रत्येकाचा संकल्प असतो. त्याच संकल्पानुसार गुरू प्रती असलेली निष्ठा, प्रेम व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अधिकाधिक गुरू महाराजांच्या भक्तगणांनी गुरू पौर्णिमा उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन दिव्य जागृती संस्थान परिवाराने केले आहे. बीड जिल्ह्यात गुरू महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत. या शिष्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. दिव्य ज्योति जागृती संस्थानच्या परळी शाखेच्या वतीने गुरू महाराजांचे कार्यक्रम घेतले जातात. गुरु-भक्तांची मोठी परंपरा राहिली आहे.

महिला, पुरुष भक्तांना बसण्यासाठी कक्ष उभारणी

हालगे गार्डन, परळी वैजनाथ होणार्‍या गुरु पौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्यामध्ये डेकोरेशन, सत्संगाच्या ठिकाणी महिला, पुरुष भक्तांना बसण्यासाठी कक्ष उभारणी, भजन, प्रवचनासाठी स्टेज उभारणी, महाप्रसाद वाटप कक्ष अशी तयारी करण्यात येत आहे. दरवेळीच्या तुलनेत यंदा भक्तगण अधिक संख्येने येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?