भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-श्री विलासनंदजी महाराज
श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे रविवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा-श्री विलासनंदजी महाराज
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे महंत श्री विलासनंदजी महाराज यांनी दिली आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैजनाथ मंदिर जवळ असलेले श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे रविवार दिनांक 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी बारा वाजता श्रींची महाआरती होणार आहे. तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी एक वाजता महाप्रसाद वितरण होणार आहे.
या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बजरंग बली वेताळ मंदिराचे महंत श्री विलासनंदजी महाराज यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा