भावना दुखविणारा व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पुन्हा दोघांवर गुन्हा दाखल

 भावना दुखविणारा व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पुन्हा दोघांवर गुन्हा दाखल


केज :- सोशल मीडियावर एका प्रार्थना स्थळाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अन्य एका समाजाच्या भावना दुखावणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणी अन्य दोघा विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 


केज शहरातील मोंढा मार्केट जवळ वास्तव्यास असलेल्या बिलाल शेख व अजीजपुरा भागातील हकीम शेख या दोघांनी २२ जुलै रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास एका समाज बांधवांच्या भावना दुखावतील असा व्हीडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्रसारीत केला. या दोघांनी दोन भिन्न समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने सदरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सर्वांना दिसेल अशा रितीने प्रसारित केल्याची तक्रार पोलीस जमादार त्रिंबक सोपणे यांनी दिल्या वरून बिलाल शेख, हकीम शेख या दोघां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


या  प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पोलीस जमादार त्रिंबक सोपने आणि पोलीस जमादार श्रीकांत चौधरी हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार