#mbnews#>>>धनंजय मुंडे शहरातील जे के फंक्शन हॉल येथे भेटून स्वीकारणार शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या परळीत धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा


सकाळी 11.30 पासून धनंजय मुंडे शहरातील जे के फंक्शन हॉल येथे भेटून स्वीकारणार शुभेच्छा


सहकारी कार्यकर्ते, हितचिंतकांशी साधणार संवाद


 वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी महामॅरेथॉन, माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी साठी विशेष मोहीम यासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


परळी वैद्यनाथ (दि. 14) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळीचे लाडके आमदार धनंजय मुंडे यांचा 15 जुलै हा जन्मदिवस असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शहरातील मलकापूर रोड येथे स्थित असलेल्या जे के फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे. 


सकाळी 11:30 पासून धनंजय मुंडे हे जेके फंक्शन हॉल येथे उपस्थित राहून सहकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना भेटून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत तसेच ते सर्वांशी संवादही साधणार आहेत. 


धनंजय मुंडे यांचे राजकीय वलय मोठे असून संबंध महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे या दृष्टीने परळी, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाचे या निमित्ताने आयोजन केले आहे. 


दरम्यान ग्रीन परळी व क्लीन परळी असा निर्धार व्यक्त करणारी विशेष महा मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा परळी शहर पोलीस ठाण्यात समोरच्या संत सेवालाल महाराज येथे सकाळी सात वाजल्यापासून शालेय गट, खुला गट व ज्येष्ठ नागरिक गट अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये होणार आहे. 


परळी वैजनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने दिनांक 15 जुलै ते 26 जुलै या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार असून प्रत्येक वार्डामध्ये महिलांना आपल्या कागदपत्रांसह या योजनेसाठी नोंदणी करण्याची सोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


धनंजय मुंडे यांच्या आयुरारोग्यासाठी 12 ज्योतिर्लीगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांची महाआरती, उमर शहावली दर्ग्याला चादर, दाऊद शहा बाबांना चादर, नवमतदार नोंदणी अभियान यासह सबंध बीड जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान, गरजू विद्यार्थ्यांना मदत यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार