जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह ठाकूर यांचे निधन
जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह ठाकूर यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
परळीतील जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय व सर्व क्षेत्रात जनसंपर्क असलेले सर्व परिचित असे व्यक्तिमत्व प्रकाशसिंह (भैय्या) ठाकूर यांचे वयोमानाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रकाशसिंह हनुसिंह (शेंगर) ठाकूर हे परळी शहरातील सर्व परिचित असे व्यक्तिमत्त्व होते. ठाकूर स्टाईल राहणीमान व पेहरावाने त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. प्रत्येकाशी अतिशय आत्मीयतेने व अधिकाराने बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाशसिंह ठाकुर होते. परळी नगर परिषदेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. परळी शहरातील जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे प्रकाशसिंह ठाकूर हे जनसंघातही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा