अज्ञाताकडून ऑटोरिक्षाची तोडफोड करुन नुकसान
अज्ञाताकडून ऑटोरिक्षाची तोडफोड करुन नुकसान
परळी (प्रतिनिधी) - शहरातील नांदुरवेस भागातील चुकार गल्ली येथे उभा असलेला ऑटो रिक्षाची अज्ञात माथेफेरूने काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नासधुस केली असल्याची घटना सोमवारच्या रात्री घडली. यामुळे ऑटो चालकांस मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. असे प्रकार यापूर्वीही शहरात काही भागात घडले होते. या घटनेत वाढ होत असून वाहनधारकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, रमेश साबणे हे ऑटो रिक्षा चालून आपली उपजीविका भागवितात त्यांनी नेहमीप्रमाणे दिनांक 15 रोजी रात्री आपला ऑटो क्र. एम. एच. २३ एक्स ५४५८ हा लावला होता. रात्री अज्ञात माथेफेरूने ऑटोचे समोरील काच दगडाने ठेचावे अशा पद्धतीने फोडून ऑटोचे नुकसान केले. या प्रकारामुळे सदरील ऑटोधारकास नाहक मोठा आर्थिक फटका बसला असून असे प्रकार यापूर्वी परळी शहरात काही भागात घडले होते अशा वाढणाऱ्या प्रकारामुळे वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील जुन्या गावभागात छोट्या - छोट्या बोळ रस्ता असल्याने वाहनधारक आपले वाहन गल्लीतच लावतात. शहरात काही अज्ञात माथेफिरू वाहनांची अशी नासधूस करतात असे प्रकार थांबले पाहिजेत अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा