इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील - रेल्वेमंत्री

 मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह घेतली बीड रेल्वेप्रश्नांवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट 



मुंबई, प्रतिनिधी....

     परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

       केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णवजी यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय  मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

Click:■ मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?

       संबधित मागण्यांवर योग्य तो विचार करून परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वेचे रखडलेले प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी आजअश्विनी वैष्णवजी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देत निरोगी आणि उदंड दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!