मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा

 विधानपरिषद निवडणूक; पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा


पंकजाताईंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची वरळी ऑफिसला तोबा गर्दी


'पंकजाताई आगे बढो', 'मुंडे साहेब अमर रहे' च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला



मुंबई।दिनांक ०२। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच आमदारांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. पंकजाताईंची उमेदवारी दाखल करतेवेळी  विधानभवन परिसरात तसेच वरळीच्या कार्यालयात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.


    विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होत असून आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपने पंकजाताईंसह आपल्या पाच उमेदवारांची घोषणा काल केली होती. आज सकाळी ११ वा. पंकजाताईंनी विधानभवनात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले, त्यानंतर घरी आई प्रज्ञाताई, माजी खासदार डाॅ.प्रितमताई, यशःश्रीताई यांनी त्यांचे औक्षण केले. 


मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा

-----

उमेदवारी दाखल केल्यानंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, धनंजय मुंडे अतुल सावे, गोपाळराव पाटील आदी मंत्री तसेच आमदार व महायुतीच्या नेत्यांनी पंकजाताईंना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यभरातून समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'पंकजाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'लोकनेते मुंडे साहेब अमर रहे' च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला होता.


वरळी ऑफिसला तोबा गर्दी; कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू

-------

विधानभवनात जाण्यापूर्वी पंकजाताई सकाळी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात दाखल झाल्या. सकाळपासूनच परळी, बीडसह मराठवाडा व राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सर्वांना भेटून त्या अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या. पुन्हा दुपारी एक वा. पासून सायंकाळपर्यंत त्या कार्यकर्त्यांना भेटल्या त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांचेशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव कार्यकर्त्यांना अतिशय जिव्हारी लागला होता, आज उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र कार्यकर्ते पंकजाताईंना भेटताना डोळ्यातील आनंदाश्रू  लपवू शकले नाहीत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार