श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान तर्फे स्वागत

 पी एम पी एम एल चेअरमन दिपा मुधोळ यांनी घेतले श्री वैद्यनाथांचे दर्शन



श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान तर्फे स्वागत

परळी -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पी एम पी एम एल ) चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ - मुंडे यांनी सोमवारी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले .यावेळी परळी चे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते. यावेळी पी एम पी एम एल चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यांचे श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी )चे अध्यक्ष दत्तापा ईटके गुरुजी, सचिव ऍड गिरीश चौधरी, ऍड. मनोज संकाये , चंद्रकांत उदगीरकर, शिवा चोंडे ,राजेंद्र ओझा, संजय खाकरे यांनी स्वागत केले.बीड च्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ - मुंडे यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांनी आपल्या कामाचा ठसा चांगला उमिटविला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची बीड येथून बदली झाल्या नंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पी एम पी एम एल )  चेअरमन व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली ,तेथे पदाची सूत्रे घेतल्यानंतर सोमवारी परळीत आल्या. त्यांनी श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार