प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

 निराधारांना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प


प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत


बीड । दि. २३ ।  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. निराधारांना आधार देणारा आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प' अशा शब्दात मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केलेला आहे. गरिब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देताना भविष्यातील ‘विकसित भारताची' रचना या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेली आहे.


कृषी उत्पादनाला दिलेली प्राथमिकता अन्नदात्या बळीराजाचा सन्मान वाढवणारी आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची केलेली तरतूद, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर, शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतूद, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य' या सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या तरतुदी आहेत. एकंदरीत निराधाराना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा हा अर्थसंकल्प आहे. या सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार' अशा भावना प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार