सर्व स्तरातील घटकांना न्याय देणारा समृध्द अर्थसंकल्प - आ. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

 सर्व स्तरातील घटकांना न्याय देणारा समृध्द अर्थसंकल्प - आ. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया





मुंबई।दिनांक २३।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा देशातील महिला, तरुण, नोकरदार तसेच शेतकऱ्यांसह मोल मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राथमिकपणे प्राधान्य देणारा  असा समृध्द अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य', गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून एक कोटी घरे, नैसर्गिक शेती आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्याचे ध्येय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माफक व्याजावर दहा लाखांचे कर्ज, युवकांना पहिल्या नोकरीत सरकारकडून अर्थसाह्य तसेच नोकरदारांना आयकरातून सूट, सर्व राज्य सरकारांना १५ वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज अशा विविध महत्वाकांक्षी व जनतेचे जीवनमान सुधारणेसाठी वैविध्यपूर्ण पैलूंचा समावेश असणारा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प जाहिर केल्याबद्दल केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांचे धन्यवाद असं पंकजाताई यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !