23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

पंकजाताई मुंडे यांचे राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन

 समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित ; वाढदिवस साजरा करणार नाही, हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक एसएमएस करा

पंकजाताई मुंडे यांचे राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन


२९ जुलैला बीड जिल्ह्यात येणार ; भगवान भक्तीगड ते परळी महापुरुषांना करणार वंदन


परळी वैजनाथ ।दिनांक २५।

२६ जुलै रोजी आपला वाढदिवस असून संपूर्ण राज्यातून वाढदिवसाच्या दिवशी ताई तुम्ही  कुठे भेटणार? अशा प्रकारचे संदेश मिळत आहेत, तथापि, हारतुरे , सत्कार, बडेजाव असा कोणताही उत्सवी स्वरूपात  वाढदिवस साजरा करणे हे सद्य परिस्थितीत  समर्पक वाटत नाही, त्यामुळे केवळ आपल्या प्रेमरुपी एका एसएमएस वर वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद प्रदान मला द्यावेत असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान, विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी येत्या २९ तारखेला भगवानभक्ती गडापासून परळीपर्यंत आपण महापुरुषांना वंदन करत  दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. वाढदिवसा दिवशी सर्वांनी आहे त्या ठिकाणावरून केवळ एसएमएसवरुन  शुभेच्छा द्याव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.

    पंकजाताई मुंडे यांनी वाढदिवसाच्या अनुषंगाने आपल्या समर्थकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ प्रसारित केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्वांना विनंतीवजा आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, माझा वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा करावा हे मला कधीच पटलेले नाही, त्याचबरोबर शिवशक्ती परिक्रमा असो की अन्य सर्व वेळी आपण भरभरून माझे कौतुक करतच असता. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. आपल्या काही बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना या अतिशय वेदनादायी आहेत. या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा करणे माझ्या मनाला न पटणारे आहे. त्यामुळे मी वाढदिवसाचे निमित्ताने हार तुरे सत्कार असे काहीही स्वीकारणार नाही. कार्यकर्त्यांनी कुठलाही बडेजाव करू नये तसेच वाढदिवशी भेटायला येण्याचे टाळावे. वाढदिवसाचे उत्सवी स्वरूप टाळून माझा मान राखावा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. 

          

*२९ जुलैला बीड जिल्ह्यात ; महापुरुषांना करणार वंदन* 

 --------------------------

दरम्यान, विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजाताई मुंडे येत्या सोमवारी २९ जुलै रोजी बीड जिल्ह्यात येत आहेत. स्वतःचा सत्कार न घेता जिल्हयातील विविध ठिकाणी महापुरुषांना त्या वंदन करणार आहेत. राष्ट्रसंत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगडावर पुष्पवृष्टी व संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन हा दौरा सुरू करणार आहोत. भगवान भक्ती गडानंतर श्रीक्षेत्र नारायणगड त्यानंतर बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करणार आहेत. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन,  परळी येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यात आपण कोणतीही हार तुरे  स्वीकारणार नसून केवळ पुष्पहार हे महापुरुषांना अर्पण करणार आहोत. त्यामुळे या दौऱ्यातही माझ्यासाठी कोणीही हार तुरे आणू नयेत असे आवाहनही पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

••••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?