परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

पंतप्रधान मोदींसह राज्यातील नेत्यांचे मानले आभार

 मला आज जे काही मिळतंय ते पाच जिवांच्या चरणी अर्पण करते :पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना 


 पंतप्रधान मोदींसह राज्यातील नेत्यांचे मानले आभार


मुंबई।दिनांक ०२।

“मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते” अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दाखल करतेवेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


  पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते. मी आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता या लोकांना भेटायला आले. ज्यांनी कधीही मला क्षणभरदेखील स्वतःला, स्वतःच्या हृदयपासून दूर ठेवलं नाही. माझ्या सर्व वाईट काळात ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आईचं दर्शन घ्यायला चालले आहे. मग मी अर्ज दाखल करेन.”

मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर भाऊ, रावसाहेब दानवे, भुपेंद्र यादव, आशिष शेलार या सर्वच सदस्यांचे आभार मानते, ज्यांनी माझं नाव सुचवलं”, असंही त्या म्हणाल्या.


त्या पुढे म्हणाल्या, “लोकांना प्रतिक्षा करावी लागली. मला हवंय ते करण्यापेक्षा लोकांना हवंय ते राजकारणात करायचं असतं. आता लोकांना हवंय ते झालंय, मी सर्वांचे आभार मानते.”


माझं यश या पाच जणांना अर्पण

-----

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी आत्महत्या केल्या. याबाबत बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते”, असंही त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!