परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव

 पंकजा मुंडे विधानपरिषदेवर ; परळीसह जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी

गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव


परळी वैजनाथ।दिनांक०१। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच परळीसह संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला.


Click:-● *अखेर भाजपने पंकजाताईंना विधानपरिषद दिली !*


    विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली, यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजाताई  मुंडे यांचे नाव जाहीर होताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टाॅवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पंकजाताईंच्या यशःश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलाल उधळून एकच जल्लोष केला. जिल्ह्यात बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई आदींसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 

••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!