साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं लोकार्पण

 परळीत आता 'तिसरा डोळा' ठरेल ‘विघ्नहर्ता’ - ना.धनंजय मुंडे

साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते झालं लोकार्पण

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
    गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजली जाणारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी यंत्रणा सर्वांसाठीच ‘विघ्नहर्ता’ ठरणार असल्याचा विश्वास कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालामंत्री ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.साडेतीन कोटी खर्चाच्या सीसीटिव्ही निगराणी यंत्रणेचे परळीत ना. धनंजय मुंडे  यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
 
            जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमधून साडेतीन कोटी रुपये तरतूद करून ही यंत्रणा परळी कार्यान्वित करण्यात आली आहे. परळीतील हा तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेचा लोकार्पण सोहळा परळी पोलीस ठाण्यात ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपविभागीय अधिकारी चोरमले, पोलीस निरीक्षक लोहकरे, ढोणे, पाटील आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

         परळी शहरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यासाठी 133 सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी बसवण्यात आले आहेत. याचा नियंत्रणकक्ष पोलीस ठाण्यात निर्माण करण्यात आला आहे. पंधरा बाय आठच्या मोठ्या स्क्रीनवर 24 तास प्रशिक्षित पोलीस कर्मचारी हे या माध्यमातून निगराणी ठेवणार आहेत. अतिशय अद्यावत अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करण्यात आलेली असून ही यंत्रणा सर्वांना उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केला.

      पुढे बोलतांना पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी सांगितले की, गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या कारवाया होत असतात.त्यात गुन्हेगारांवर आणखी वचक निर्माण व्हावा,कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या सीसीटिव्ही यंत्रणेची मोलाची मदत होणार आहे. सीसीटी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांना मदत तर होईलच, शिवाय नागरिकांच्या  स्वसुरक्षिततेचा हेतू साध्य होऊ शकेल.चेन स्नॅचिंग, चोरी, घरफोडी, महिलांची छेडखानी, टवाळखोरी आदींना आळा, तर अपघाताबाबत माहिती समोर येऊ शकेल.

        अनेक गैरप्रकारांना चाप, गुन्हेगारांना वचक बसू शकेल. जनता भयमुक्त राहू शकेल.तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले असून, त्यांचा कंट्रोल पोलिसांकडे असणार आहे.शहरातील 133  कॅमेरे  वाहतुकीसह सर्व चित्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एलसीडी वॉलवर बघता येत आहे. त्यामुळे पोलिसांना या नियंत्रण कक्षातूनच निगराणी करता येणार आहे.नियंत्रण कक्षात 15 बाय 8 फुटांची एलसीडी वॉल बसवली आहे.डबल पॅनलचे मॉनिटरही असून, त्यावर सीसीटीव्हींचे चित्रीकरण बघता येईल. या प्रणालीद्वारे संपूर्ण शहरावर लक्ष ठेवता येणार आहे.ही यंत्रणा सर्वांना उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केला.

---------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार