कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग

 नको हार, नको सत्कार: धनंजय मुंडेंनी साधेपणाने केला शुभेच्छांचा स्विकार


कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग


परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.....

         राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने परळी मोठा भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला मात्र सकाळपासून दिवसभर धनंजय मुंडे यांनी हार तुरे, शाल, श्रीफळ असा कोणताही सत्कार स्वीकारला नाही. आपलं प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी नागरिकांनी आणलेले पुष्पहार व पुष्पगुच्छ त्यांनी नाकारत उलट आलेल्या प्रत्येकाचा त्यांनीच सत्कार केल्याचे बघायला मिळाले. आजच्या वाढदिवसा दिवशी ही बाब लक्षवेधी ठरली.

         ना. धनंजय मुंडे यांनी नको हार नको सत्कार अशा पद्धतीने साधेपणाने आपल्या वाढदिवसा दिवशी हजारो समर्थकांच्या शुभेच्छांचा साधेपणाने अतिशय आत्मियतेने स्वीकार केला. प्रत्येकाशी हस्तांदोलन, गळाभेट घेत आपले हे प्रेम व  विश्वास हीच माझी ताकद आहे. हे कायम ठेवा अशा प्रकारचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान धनंजय मुंडे यांनी सकाळी वाढदिवसानिमित्त कुटुंबीयांसमवेत प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा व दर्शन घेतले. त्यानंतर परळीत आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून त्यांनी आपल्या समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मात्र कोणाच्याही शाल, श्रीफळ, फेटा,पुष्पगुच्छ, हारतुरे आदी सोपस्कारांना फाटा देत  जिव्हाळ्याचा  अतिशय साधेपणाने त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा साधेपणाने स्वीकारणे हे मात्र आज लक्षवेधी ठरले.

Click:● *संतापजनक:पंकजा मुंडेंविरोधात 'फेक नरेटीव्ह' सेट करण्याचा काही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजा मुंडे यांचा इशारा*

      पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथची पूजा व आरती केल्यानंतर वैद्यनाथाचा आशीर्वाद  व प्रसाद म्हणून त्यांनी प्रभु वैद्यनाथाच्या हाराचा स्वीकार केला. त्यानंतर वाढदिवसानिमित्तचा कुठलाही हार ,पुष्पगुच्छ व सत्कार धनंजय मुंडे यांनी स्वीकारला नाही. अतिशय साधेपणाने त्यांनी सर्वांच्या केवळ शुभेच्छा स्वीकारल्या.


● कृषीमंत्रीपदाची वर्षपूर्ती आणि वाढदिवस : विलक्षण योगायोग

-------------------------

        धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले त्याला आज एक वर्ष झाले. मागील वर्षी आजच्या दिवशी त्यांनी वाढदिवस साजरा न करता कृषीमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर वाढदिवस बाजूला ठेवून खात्याचा आढावा घेतला होता.एक वर्षात त्यांनी इतके काम चांगले केले की दोनच दिवसापूर्वी त्यांना दिल्ली येथे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राला पुरस्कार मिळाला.एका वर्षात धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य करून दाखवले. दरम्यान नेहमीच कर्तव्याला प्रथम प्राधान्य देण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न दिसुन येतो. या वाढदिवसाला हारतुरे टाळत निखळ प्रेम व आत्मियतेच्या शुभेच्छांचा स्विकार करत त्यांनी साधेपणा व एक वेगळेपण जपल्याचे दिसुन आले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार