प्रा.टी.पी.मुंडे यांच्याकडून लहाने कुटुंबीयांचे सांत्वन
प्रा.टी.पी.मुंडे यांच्याकडून लहाने कुटुंबीयांचे सांत्वन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी
ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी लहाने कुटुंबीयांचे कुटुंबीयांचे त्यांच्या राहत्या घरी माकेगाव येथे भेट घेऊन सांत्वन केले आणि कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.
प्रसिद्ध डोळ्याचे तज्ञ डॉ. श्री. तात्याराव लहाने यांच्या मातोश्री अंजनाबाई यांचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. लहाने यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याचबरोबर कुटुंबीयांचे सरांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुखातून परमेश्वर सावरण्याची शक्ती देवो तसेच त्यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी त्यांनी अर्पण केली.
यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, जीवा लहाने ,बालाजी लहाने आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा