पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विनायक राजमाने सेवानिवृत्त

 विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विनायक राजमाने सेवानिवृत्त

परळी / प्रतिनिधी


परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राजमाने हे विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.सोमवार दि 1 रोजी त्याच्या सेवापूर्ती गौरव सोहळा महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित परळी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली सर्वात मोठी शाळा असलेल्या महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राजमाने 28 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.सेवापूर्ती निमित्ताने सोमवार दि 1 रोजी त्याचा गौरव सोहळा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.या प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,केंद्र प्रमुख विश्वंभर चेनलवाड, माजी मुख्याध्यापक भगवान बडे, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, मुख्याध्यापक सुरेश बुरांडे आदी सह राजमाने परिवारांचे स्नेही,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?