हत्या झाली, रोहित पवार मात्र राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप

बापू आंधळे हत्या प्रकरणी वक्तव्य:आ.रोहित पवारांच्या निषेधार्थ रा.काॅ.कडून उद्या परळी बंदची हाक


परळी वैद्यनाथ (दि. 02) - 29 जून रोजी परळी वैद्यनाथ शहरात धनंजय मुंडे समर्थक मरळवडीचे सरपंच असलेले बापूराव आंधळे यांची डोक्यात गोळ्या झाडून  हत्या करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण गोळीबारात जखमी आहे. या प्रकरणात पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला असून ते तपास करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे  आमदार रोहित पवार यांना स्वतःची व आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे व त्याच्या कुटुंबविषयी सहनुभीती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत आहेत.धनंजय मुंडे यांची व परळीची बदनामी करत सुटले आहेत. त्यांचे हे वर्तन अत्यंत असंवेदनशील व निषेधार्ह असून बुधवार दि. 03 जुलै रोजी परळी शहर बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.          एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणखी एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याबद्दल कोणतीही संवेदनशीलता न दाखवता केवळ राजकारण मध्ये आणून आरोपीचे समर्थन करायचे इतकेच नाही तर उलटपक्षी परळीची आणि आमच्या नेत्यांची बदनामी करायची, हे वाचाळवीर रोहित पवारांना शोभत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे. 

       उद्या बुधवार दि. 03 जुलै रोजी परळी शहर पूर्णपणे बंद ठेवणार असुन याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयास देण्यात आले आहे. तसेच सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी या बंदला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार