इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात
इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात
परळी:इनरव्हील क्लब क्लबच्या अध्यक्षपदी श्रध्दा नरेश हालगे यांची सर्वानुमते नियुक्ती झाली असून त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार नुकता स्वीकारला आहे.
इनरव्हील क्लब ऑफ परळी वैजनाथ चा पदग्रहण सोहळा येथील गांधी मार्केट सर्वेश्वर मंदिर मध्ये पार पडला . या कार्यक्रमाची सुरुवात इनरव्हील गीतेने झाली .त्यानंतर गणेश पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा विद्या गुजर यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा सादर केला नंतर नूतन अध्यक्षा श्रध्दा नरेश हालगे यांना चार्टर पिन Collar देऊन पदभार सोपवला
उपाध्यक्ष: उर्मिला कांकरिया ,सेक्रेटरी- विजया दहिवाळ ,ट्रेझर -तारा अग्रवाल आय एस ओ- छाया देशमुख -एडिटर शैलजा बाहेती यांनीही पदभार स्वीकारला.तसेच इसी मेंबर म्हणून उमा समशेट्टी, स्मिता ठक्कर, दुर्गा राठौर ,अनिता धुमाळ शोभना सौदळे यांची निवड करण्यात आली
इंटरनॅशनल इनरव्हील क्लब 32 वर्षांपासून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. असेच अजून चांगले कार्यक्रम राबविण्याचा क्कीच प्रयत्न करेन असे मनोगत अध्यक्षा श्रध्दा हालगे यांनी व्यक्त केले .याप्रसंगी अध्यक्षांच्या हाताने स्वयं सिध्दा.ई बुलेटिन चे विमोचन करण्यात आले यावेळी गरजू महिलांना राजस्थानातून आलेल्या कारागीराकडून वेस्ट इज बेस्ट असे लोकरी पासून क्राफ्ट तयार करायला शिकविले
सुत्रसंचलन शैलजा बाहेती यांनी केले आभार प्रदर्शन उर्मिला कांकरिया यांनी केले या कार्यक्रमास संगीता रेवडकर सुरेखा बेंडसुरे ,शुभांगी गीते ,अनिता पत्रावळे उपस्थित होत्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा