परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परळीत संत नामदेवराय संजीवन समाधी सोहळ्या निमित्त उत्सहात अखंड हरिनाम सप्ताह सुरु

 परळीत संत नामदेवराय संजीवन समाधी सोहळ्या निमित्त उत्सहात  अखंड  हरिनाम सप्ताह सुरु


परळी वै.,दि.३०(प्रतिनिधी):- परळी वै. शहरातील श्री.संत नामदेव महाराज मंदिर याठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.२७ जुलै २०२४ रोजी याचा प्रारंभ झाला असून दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक समस्त शिंपी समाज बांधव, परळी वै. यांनी केले आहे. 

                                     याबाबत अधिक माहिती अशी की, परळी वै. शहरातील श्री.संत नामदेव महाराज मंदिर याठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.२७ जुलै २०२४ रोजी याचा प्रारंभ झाला असून दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख म्हणून ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के हे असणार आहेत. तर दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा, ६:३० ते ७ विष्णूसहस्त्रनाम, ७ ते ११ श्री.ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, २ ते ४ भावार्थ रामायण, ४ ते ६ महिला भजनी मंडळ व धुपारती, रात्री ८ ते १० हरी जागर होईल. दिनांक ३१ जुलै २०२४ बुधवार रोजी एकादशीनिमित्त सकाळी ११ ते १ गिता पारायण होईल. यासाठी पारायण प्रमुख गिताभक्त ह.भ.प.संपत महाराज गित्ते गुरुजी हे असणार आहेत. तर दिनांक २ ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी ठीक १० ते १२ वाजता गिताभक्त ह.भ.प.संपत महाराज गित्ते गुरुजी यांचे सुश्राव्य किर्तन होईल. त्यानंतर पालखी मिरवणूक व नंतर सार्वजनिक महाप्रसाद संपन्न होईल. तसेच त्याच दिवशी ८ वाजता ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होईल. दिनांक ३ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी सकाळी ठीक ११ ते १ या वेळेत ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांचे काल्याचे किर्तन संपन्न होईल. व दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी प्रक्षाळ पूजा होईल व श्री.संत नामदेव महाराज महिला भजनी मंडळाचे भजन होईल. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक समस्त शिंपी समाज बांधव, परळी वै. यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!