अखेर पंकजाताईंना विधानपरिषद दिली !
अखेर पंकजाताईंना विधानपरिषद दिली !
मराठवाड्यात बसलेल्या राजकीय पराभवावर मार्ग काढण्याच्या हालचाली आता भाजपकडून सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण, आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या जागेसाठी पंकजा मुंडेंनाही संधी देण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्ष ऑक्टोबर महिन्यात घोषित होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांची चर्चा सुरू होती. त्यामध्ये, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांचा भाजपच्या यादीत समावेश आहे.
भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा सुरू होती ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला खुश करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधानपरिषदेत संधीत देऊन जातीय समीकरणं जुळवण्याचं काम भाजपकडून होणार आहे. त्यामुळे, गेल्या 5 वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकजा मुंडेंचा लवकरच विधिमंडळात सदस्य म्हणून समावेश होईल.तर, सातत्याने नाराजी दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांना गुलाल उधण्याची संधी मिळणार आहे.
भाजपने जाहीर केले विधान परिषदेचे 5 उमेदवार:-
पंकजा मुंडे
परिणय फुके
सदाभाऊ खोत
अमित गोरखे
योगेश टिळेकर
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळणार का? यावर चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंकजा मुंडे सारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडेंच्या माध्यमातून भाजपचे ओबीसी गणित
पंकजा मुंडे यांचे समर्थन करणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला पराभवाचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये, यासाठी भाजपकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच ओबीसी मते भाजपकडे वळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना संधी दिली गेली आहे. त्यासाठी विधान परिषदेच्या 13 जुलैला होणाऱ्या 11 जागांसाठी निवडणुकीत भाजपने पाच उमदेवार जाहीर केले आहे. भाजपचे सध्याचे संख्याबळ पाहता हे पाचही उमेदवार निवडून येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा