समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन
कोळी महादेव समाजाच्या आरक्षण प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेणार - बाळासाहेब आंबेडकर
समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन
परळी वैजनाथ प्रतिनिधी
कोळी महादेव समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आपण सकारात्मक भूमिका घेऊन समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज दिले.
मराठवाडा व राज्यातील आदिवासी कोळी महादेव व मल्हार कोळी समाजाच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय जाती प्रमाणे अनुसूचित जमातीसाठीही रक्त नात्यातील वैधता देण्यासाठी शासन निर्णय घेणेसाठी आदिवासी कोळी महादेव व मल्हार कोळी समाजाची तात्काळ बैठक घ्यावी आधी मागण्याबाबत आंबेडकर यांना यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना आंबेडकर यांनी महादेव कोळी समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली शिष्टमंडळामध्ये कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव कंडूकटले, आदिवासी विकास मंचचे शंकर गंगाधरे, अजय बळवंत, ज्ञानोबा सुरवसे आदींचा समावेश होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा