कु. निधी निलेश शेटेची निवड
कु. निधी निलेश शेटेची निवड
परळी : येथील कु. निधी निलेश शेटे हिची वृंदावन येथील सामविद गुरुकुलम गर्ल्स सैनिक स्कूल येथे निवड झाली आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा शिस्त व त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी तसेच संरक्षण सेवांमध्ये अधिकारी होण्यासाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षण देण्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल ची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय चाचणी एजन्सी द्वारे 8 जानेवारी 2024 ला ऑल इंडिया सैनिक स्कूल साठी प्रवेश परीक्षा झाली होती अतिशय कठीण असलेले या परीक्षेत परळी येथील कुमारी निधी निलेश शेटे हिने 300 पैकी 250 गुण मिळवून इयत्ता सहावी साठी वृंदावन येथील सैनिक स्कूल साठी प्रवेश निश्चित केला आहे.
निधी लहानपणापासूनच बाल कीर्तनकार असून तिला भरतनाट्यम, गायन यामध्ये ही तिला विशेष रुची आहे.तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिला सहशिक्षक विवेक भोसले ,समीर , नवनाथ देशमुख , सौ माधुरी पाटील तसेच अंबाजोगाई येथील खोलेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा