शेतमजूर युनियनची तहसीलवर निदर्शने
शेतमजूर युनियनची तहसीलवर निदर्शने
परळी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा)
परळी तालुका कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवार दि 25 रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी तालुक्यातील अनेक गावातुन मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आले होते.
भूमिहीन शेतमजूर, वृद्ध , निराधार व ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ सुरू करा. राज्य सरकारने या महामंडळासाठी निधीची तरतूद करावी.भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण गरिबांना सामाजिक सुरक्षा देणारा सर्वंकष केंद्रीय कायदा करावा.केरळ राज्याच्या धर्तीवर बेघरांना घरकुलासाठी सात लाख रुपये अनुदान द्यावे.विधवा व निराधार महिलांचे कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणासाठी व लग्नासाठी अर्थसहाय्य करण्यात यावे.ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड नाही त्यांना राशन कार्ड वाटप करून स्वस्तात धान्य वाटप करावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) परळी तालुका कमितीकडून तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली.
या प्रसंगी युनियनचे सय्यद रज्जाक,कॉ. सुदाम शिंदे,कॉ. सखाराम शिंदे,कॉ विष्णू पोटभरे, कॉ रेखा शिंदे, कॉ संगीता रुमाले, कॉ प्रकाश उजगरे, कॉ चंद्रकला शिंदे आदींसह अनेक जण उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा