सद्गुरूच योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो -स्वामी निरूपानंदजी

 दिव्य ज्योति जाग्रति संस्थानची गुरूपोर्णिमा परळीत उत्साहात साजरी


गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-सुश्री शैलासा भारतीजी


सद्गुरूच योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो -स्वामी निरूपानंदजी


परळी वै./प्रतिनिधी

भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे कृपापात्र शिष्या सुश्री शैलासा भारतीजी यांनी व्यक्त केले. 


परळी येथील हालगे गार्डन येथे आज मंगळवार दि.23 जुलै रोजी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने आयोजित गुरू पोर्णिमा उत्सव 2024 प्रसंगी प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री शैलासा भारतीजी बोलत होत्या. कार्यक्रमस्थळ भक्तांनी आकर्षकरित्या सजविल्याने आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. परिसरात रांगोळी काढून आणि सुशोभिकरण केल्याने वातावरण प्रसन्न दिसत होते. प्रवेशद्वारालाच प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे आकर्षक स्वरूप एका सुंदर मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या मंदिरापुढेही आकर्षकरित्या काढलेली रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. सत्संग परिसरात विविध साहित्याचे स्टॉल लावले होते. 

आपल्या सत्संग कार्यक्रमातून सुश्री शैलासा भारतीजीनी  गुरू कोण असावा ? यापासून शिष्यापर्यंतची संपूर्ण व्याख्या अतिशय सहजतेने व विविध उदाहरणासह स्पष्ट केले. ते म्हणाले की, गुरू सेवा ही सर्वश्रेष्ठ असून ही सेवा श्री हनुमंतासारखी पारदर्शक असावी. श्रीराम व हनुमान यांचे संदर्भ उदाहरण देवून सुश्री शैलाषा भारतीजी पुढे म्हणाल्या की, गुरू हा बुद्धीचा राजा असून गुरू व शिष्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जीवन जगत असतांना आपणास अनेक अडचणी येत असतात. परंतू या अडचणीतूनही सदाचाराचा मार्ग दाखविण्याचे काम आपले गुरू नकळतपणे करीत असतात त्याकरीता गुरूवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असून अनेकदा गुरू शिष्याची परिक्षा घेतो तेंव्हा शिष्याने त्या प्रसंगाला तन्मयतेने तोंड दिले पाहिजे असे सुश्री शैलाषा भारतीजी म्हणाल्या.


या कार्यक्रमात बोलतांना आशुतोषजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य स्वामी निरूपानंदजी यांनी सांगितले की, सध्याचे जीवन अत्यंत खडतर असून स्पर्धेच्या युगात मानव नाहकपणे भरकटत आहे. अशावेळी गुरू त्यांना योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो असे त्या म्हणाल्या. दरम्यान सर्वश्री आशुतोषजी महाराज हे आम्हा सर्वांचे गुरू असून त्यांनी दिलेली शिकवण आमच्या जीवनाचे सार्थक करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास स्वामी निरूपानंदजी यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरूचरणी विविध भजने सादर करण्यात आली. टाळ तसेच संगीताच्या स्वरध्वनीवर गुरू पोर्णिमा उत्सव व सभागृह अक्षरश: मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली. व्यासपीठावर सुश्री सुषमा भारतीजी, सुश्री अन्नपूर्णा भारतीजी आदी उपस्थित होते.  

यावेळी उपस्थित साधक व भक्त टाळ्यांच्या गजरामध्ये भजनात सहभागी झाले होते. परळीसह अंबाजोगाई, सोनपेठ, गंगाखेड, नांदेड, सिरसाळा,माजलगाव, कळंब, केज, लातूर आदी ठिकाणाहून भाविकांची अलोट गर्दी या सत्संग सोहळयास लाभली होती. गुरूपोर्णिमेच्या या कार्यक्रमामुळे परळी शहरात धार्मिकतेचे भरगच्च वातावरण दिसून येत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !