श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात

 श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात

 परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)

                श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता.२१) गुरुपौर्णिमा ते रविवारी  (ता.२५) आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. या चार्तुमास सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कपीलधार पंच कमिटी व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

             स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५१ वे वर्षे आहे.रविवारी (ता.२१) गुरुपौर्णिमेला या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात पहाटे शिवपाठ, मन्मस्वामी यांची महापूजा, रुद्रपठण, गाथा भजन, प्रवचन, किर्तन, शिवजागर, महाप्रसाद आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ३५ दिवस विविध मान्यवर महाराजांचे किर्तन होणार आहेत. त्याचबरोबर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या सर्व कार्यक्रमास महाराष्ट्रातील वीरशैव समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कपीलधार देवस्थान पंच कमिटी व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !