अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा

 परळीत डेंगूची साथ; नगरपालिकेने जंतुनाशक फवारणी करावी - प्रा.विजय मुंडे

सात दिवसाच्या आत संपूर्ण परळी शहरात फवारणी करावी अन्यथा प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा! 



परळी वैजनाथ प्रतिनिधी 

परळी शहरामध्ये सध्या डेंगूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नगरपालिका प्रशासनाने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही त्यामुळे डेंगूची साथ पसरत चालली आहे येत्या सात दिवसांमध्ये फवारणीला सुरुवात करावी अन्यथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल तसेच पालिकेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा परळी मार्केटचे माजी उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी दिला आहे. 

   सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गेल्या चार दिवसापासून शहरासह परिसरात चांगल्या प्रकारचा पाऊस झाला असून शहरात अनेक ठिकाणी नाल्या दुरुस्त नाहीत सगळीकडे खड्डे असल्यामुळे तेथे पावसाचे पाणी साठल्यामुळे तेथे डेंगूच्या मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे अनेक शहरांमध्ये डेंगू चे रुग्ण पहावयास मिळत असून त्यामध्ये वाढ होत आहे. शहरातील दवाखान्यामध्ये रुग्णांची वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पर्यायाने नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. 

   नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याची खेळू नये. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यांनी यामध्ये विशेष लक्ष घालावे आणि येत्या सात दिवसांमध्ये जंतुनाशक परळी शहरांमध्ये फवारणी करावी अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी नगरपालिकेवर महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येईल त्याची सर्वस्व जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाचे असेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !