अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
अक्षरगंगा स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चि वेदांत महादेव गुट्टे याने तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला असून त्याला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट ता परळी वैजनाथ या शाळेतील इयत्ता दुसरी व तिसरी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले असून मंगळवारी मुख्याध्यापक श्री राठोड डी बी आणि शिक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. इयत्ता दुसरी व तिसरी वर्गातील ११ विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला होता. दोन्ही वर्गांसाठी वर्गशिक्षिका असलेल्या श्रीमती चट शुभांगी यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी चि वेदांत महादेव गुट्टे याने तालुका स्तरावर असलेल्या केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
त्यांच्यासह दहिफळे श्रेयश बालासाहेब, गुट्टे यशश्री कृष्णा, गुट्टे श्रेया रामकृष्ण, गुट्टे महारुद्र भीमराव, खांडेकर वैजनाथ शिवाजी, गुट्टे सई अशोक, गुट्टे धनश्री बालासाहेब, गुट्टे श्रुती वैजनाथ, गुट्टे शिवकन्या सुनील, खांडेकर नागार्जुन मुंजाजी या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले आहे.
MTS परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप : याच कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षात MTS अर्थात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवलेल्या कु चैतन्या सुनील गुट्टे, कु अक्षरा सचिन गुट्टे, कु अक्षरा संदीप गुट्टे, कु यशश्री तुळशीराम गुट्टे, कु वैष्णवी विठ्ठल गुट्टे, कु कोमल कृष्णा गुट्टे विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. मार्गदर्शन केलेल्या श्रीमती काळे प्रिया यांच्यासह शिक्षक श्री फुटके चंद्रशेखर, तरुडे सरोजकुमार, राजेश्वर स्वामी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही परीक्षांचे मार्गदर्शन परळी तालुक्याचे केंद्रसंचालक असलेले श्री सौदागर कांदे यांनी केले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
Thank you Sir ji
उत्तर द्याहटवा