इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

संतापजनक:पंकजा मुंडेंविरोधात फेक नरेटीव्ह सेट करण्याचा काही चॅनल्सचा प्रयत्न

 पंकजा मुंडेंविरोधात फेक नरेटीव्ह सेट करण्याचा काही चॅनल्सचा प्रयत्न ; अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजा मुंडे यांचा इशारा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
        भाजपा राष्ट्रीय सचिव व नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट व्हावा या दृष्टिकोनातून बातम्या चालवणे, ओढून ताणून कोणत्याही मुद्द्याला ताणून धरत,संबंध नसतांना पंकजा मुंडे यांच्या बाबतीतला राजकीय दृष्ट्या निगेटिव्ह नरेटिव्ह सेट व्हावा असे मुद्दामहून करण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. याबाबत पंकजा मुंडे आता संतप्त झाल्या असून या संबंधित चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
     महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात दररोज वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. यातच पूजा खेडकर यांचा भाजपशी संबंध असून त्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याच्या अतिरंजीत बातम्या चालवून केवळ सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व टीआरपीच्या मागे धावताना एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या करिअरला बाधा आणण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या विधानांमधून अर्धसत्य विधाने काढून तेवढ्याच नकारात्मक संदेश जाणाऱ्या बातम्या चालवणे, अनेक विधानांचे विपर्यास करणे, मनाला येईल ते अन्वयार्थ लावणे आदी विविध प्रकार पंकजा मुंडे यांच्या बाबतीत 2014 पासून सुरू आहेत. हे कोणीतरी जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते. पंकजा मुंडे यांना नुकतीच विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली आहे. त्यांना मंत्रीही केलं जाणणार असल्याची  मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.


    मात्र पंकजा मुंडे यांच्या राजकीय वाटचालीतील प्रगती डोळ्याला न देखवणाऱ्या लोकांनी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत खोडसाळपणाने फेक  नरेटिव्ह कसा सेट करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. या संदर्भाने हे पूजा खेडकर प्रकरण संबंध नसताना पंकजा मुंडेंशी जोडून अतिरंजीत व सनसनीखेज  बातम्या चालविण्याचा सपाटा काही चॅनल्सने सुरू केला आहे. यावर आता पंकजा मुंडे या संतप्त झाल्या आहेत. मुद्द्यांचे  बोलणं सोडून चुकीच्या गोष्टी पसरविण्याकडे या वाहिन्यांचा इंटरेस्ट असल्याचे म्हटले असून माझ्यासोबत 2014 पासून अशाच पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात असंच चालणार का अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.या संबंधित चॅनल्सवर आपण अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या