संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा

 जन्ममरणाची येरझार चुकवायची असेल तर आपल्या ह्रदयमंदीरात हरीला साठवावे लागेल- ह.भ.प.पांडूरंग महाराज घुले


परळी(प्रतिनिधी) 

 जन्म आणि मृत्यूची येरझार थांबवून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या हृदय मंदिरात हरीला साठवले पाहिजे.वास्तविक हरिहर प्रत्येकाच्या आत मध्ये विराजमान असतोच परंतु स्वतः मधील हरी दिसणे हे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नसते . त्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हावी लागते तेव्हाच आपल्यातील असलेल्या हरीचे दिव्यदृष्टीने दर्शन घडत असते असे प्रतिपादन देऊ येतील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह भ प पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैजनाथ येथे चालू असलेल्या संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे कीर्तन सेवेच्या प्रसंगी प्रतिपादन केले.

 संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै पासुन ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.यानिमीत्त रात्री 7 ते 10 या वेळेत ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे हरिकीर्तन पार पडले.यावेळी संत तुकारामांच्या सांठविला हरी ।

जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥

त्यांची सरली येरझार ।

जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥

हरी आला हाता ।

मग कैंची भय चिंता ॥२॥

तुका म्हणे हरी ।

कांहीं उरों नेदी उरी ॥३॥ या अभंगावर विमोचन करताना वारकरी सांप्रदायाने संपुर्ण मानवी कल्याणाची शिकवण दिली असल्याचे सांगितले.यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती.दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,दि.०१ ऑगस्ट रोजी ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवे,दि.०२ ऑगस्ट रोजी ह.भ.प.अर्जुन महाराज लाड,दि.०३ ऑगस्ट रोजी ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे.

नगर प्रदक्षिणा,गुणवंतांचा सत्कार व रक्तदान शिबीर

 अखंड हरिनाम सप्ताहात गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा.रक्तदान शिबीर व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन दि.३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. संत सावतामाळी मंदिर येथुन सावता महाराज पालखी सोहळा निघणार आहे. मंगल कलश, ध्वज पताका, टाळ,विणा,मृंदग,बॅन्ड लेझीमच्या निनादात दिंडी सोहळा निघणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार