दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने मंगळवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक परमपूज्य श्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी हालगे गार्डन परळी वैजनाथ येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी परळी वैजनाथ येथे जागृती संस्थांचे संस्थापक श्री गुरु आशुतोषजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हालगे गार्डन येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान च्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता आरती होणार असून 10 वाजता सत्संग, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिव्य ज्योती जागृती संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा