पूर्णवाद जीवन कला मंदिरात गुरुपोर्णिमा उत्सव उसाहात साजरा

 पूर्णवाद जीवन कला मंदिरात गुरुपोर्णिमा उत्सव उसाहात साजरा



प्रतिनिधी, परळी - येथील विद्यानगर भागातील पूर्णवाद जीवन कला मंदिरात पूर्णवाद परिवाराचे प्रणेते डॉ. प. पू. श्री. रामचंद्र महाराज पारनेरकर  यांच्या स्थानिक साधकांकडून रविवारी गुरुपोर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाराजांच्या मूर्तीवर वेदांत विनयराव देशपांडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पाद्यपूजा करण्यात आली. पूजा, अभिषेकाचे पौरोहित्य नीलेश पुजारी यांनी केले. दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील पूर्णवादी शिक्षिका मीना प्रमोदराव देशपांडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी गुरुंचे जीवनातील स्थान, महत्त्व विषद केले. मीना देशपांडे यांचे संध्या बुद्रुककर यांनी स्वागत केले. तर सूत्रसंचालन मुकुंद बुद्रुककर यांनी केले. कार्यक्रमास निवृत्त न्यायाधीश प्रमोद  देशपांडे, मंदिराच्या अध्यक्षा वनिता वामनराव देशपांडे, परळीतील वैद्य डॉ. आनंद टिम्बे, उपसंपादक अनंत कुलकर्णी, अलका मुंडे, सुभाष देशपांडे, मीरा सितापती, ओम प्रकाश चिखले, मंगल देशपांडे, विद्या देशपांडे, सुश्रुत देशपांडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !