नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

 शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

शासन प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी सोमवार दिनांक 22 जुलै पासून राज्यभरात शासनास स्मरणपत्र व निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे *ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन एक हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात यावी

मुला मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे

 प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे

 या सह समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षात शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अनेक वेळा आंदोलन करून निवेदन देऊनही सरकारने दुर्लक्ष केले यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्याची निवेदन दिले आंदोलनाचा भाग म्हणूनच जालना येथील गांधी चमन येथे 28 नोव्हेंबर 2023 रोजी दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले पालकमंत्र्याच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले व दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री अतुल सावे मंत्री छगन भुजबळ मंत्री संदिपान भुमरे मंत्री संजय राठोड आमदार नारायण कुचे आमदार नमिता मुंदडा आमदार मनीषा कायंदे जालना जिल्हा जिल्हाधिकारी व विविध विभागाचे सचिव यांच्यासह समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले परंतु आश्वासनाशिवाय आजपर्यंत काहीही मिळाले नाही या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यात प्रत्येक जिल्हात तालुक्यात शासनाला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागोचा नारा दिला आहे.

       यासाठी धनंजय कुलकर्णी श्रीकांत जोशी विजया कुलकर्णी अँड राजेंद्र पोदार अँड बलवंत नाईक इश्वर दिक्षित शाम कुलकर्णी अशोक वाघ उदय जोशी अनिल डोईफोडे संतोष कुलकर्णी किशोर पाठक संजय देशपांडे प्रज्ञा भिडे स्वप्निल केळकर अँड भानुदास शौचे अँड शेखर जोशी अनिल दिक्षित प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या सह राज्यातील समन्वयक परिश्रम घेत आहेत अशी माहिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या