परळी वैजनाथ येथे १५ ते १९ जुलै दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन

 परळी वैजनाथ येथे १५ ते १९ जुलै दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
        प्रेम भक्ति साधना केंद्र व समस्त नक्षरवासी सद्भक्तगण द्वारा पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे १५ ते १९ जुलै दिव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
         सुरेश टाक यांच्या. मार्गदर्शनाखाली श्री कल्याणकारी बहुउद्देशीय प्रतिष्ठान,प्रेम भक्ति साधना केंद्र, हरीहर भजनी मंडळ व न्यू माणिक नगर, यांच्या वतीने कल्याणकारी हनुमान मंदिर, न्यू माणिक नगर, परळी वैजनाथ येथे सत्संग होणार आहे.च.अ. संगीत व तत्वज्ञान (नागपूर) प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिध्दारुढ आश्रम, निवाणे (नाशिक) च्या परम श्रध्देय सु. श्री. मनिषा दिदीजी आपल्या दिव्य अमृतवाणीद्वारे सर्व सद्भक्तांना उद्बोधन करणार आहेत.कथा वेळ दुपारी ३ ते ५ वा. असुन मृदंगाचार्य ह.भ.प. परमेश्वर महाराज सोडगीर, हार्मोनियम ह.भ.प.श्रीमती अल्काताई हुंडेकरी संगीतसेवा देणार आहेत.सोमवार, दि.१५/७/२०२४ विषय- सत्संग मंगळवार, दि.१६/७/२०२४ विषय-साधक,बुधवार, दि.१७/७/ २०२४ विषय-साधना, गुरुवार, दि.१८/७/ २०२४  विषय-सेवा,शुक्रवार, दि.१९/७/२०२४ विषय- सद्गुरु अशी कार्यक्रमाची रुपरेषा असणार आहे.
       या दिव्य सत्संगाचा साधकांनी, भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कल्याणकारी बहुउद्देशीय प्रतिष्ठान,प्रेम भक्ति साधना केंद्र, हरीहर भजनी मंडळ व न्यू माणिक नगर, यांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !