मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?
मुंडें बहिण भाऊ आणि समवेत शिष्टमंडळ: महत्त्वपूर्ण भेटीत रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?
मुंबई, प्रतिनिधी....
परळीसह बीड रेल्वेप्रश्नांवर मुंडे भावडांनी शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भातील प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची आज ना.धनंजय मुंडे व भाजप राष्ट्रीय सचिव आ.पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात परळी वैजनाथ व बीड येथील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात शिष्टमंडळासह सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे यांच्या समवेत शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
रेल्वेमंत्र्यांकडे काय मांडले प्रश्न ?
------------------------
परळी वैद्यनाथ-परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण संदर्भात कुठल्याही परळीकराचे राहते घर बाधित होऊ नये, परळी येथून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, नांदेड-पनवेल एक्सप्रेस मुंबई पर्यंत विस्तारित करावी, घाटनांदूर येथे ठराविक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यांसह बीड जिल्ह्यातील विविध रेल्वे मागण्यांच्या संदर्भात आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली.संबंधित मागण्यांवर सकारात्मक विचार करून लोकहितार्थ व योग्य निर्णय घेतले जातील, असा शब्द श्री.वैष्णव यांनी दिला आहे.
----------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा